रा भा शिर्के प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न
गुरूवार दिनांक 20/06/24 रोजी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा भा शिर्के प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री के डी कांबळे सर यांनी प्रास्ताविक करताना दहावीच्या वार्षिक निकालाचा आढावा घेतला. शाळेचा निकाल 99.31 टक्के लागल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सौ एस यु सप्रे मॅडम यांनी बक्षिसपात्र विद्यार्थ्यांचे वाचन केले. सर्व मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रथम क्रमांक कु वेद कुंदन आमरे, द्वितीय क्रमांक कु आर्यन सचिन देसाई, तृतीय क्रमांक कु ईशा संदेश रहाटे यांनी उज्वल यश संपादन केले.शालेय समितीचे अध्यक्ष ॲड. श्री विजयराव साखळकर सर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सर्व शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले. सर्व विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ टी.जे.यादव मॅडम यांनी आणि श्री आर वाय कांबळे सर यांनी आभार मानले.