पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त २३ रोजी विविध कार्यक्रम

पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी राज्यपाल पद्मभूषण राम नाईक व राष्ट्रसंत डॉ. ह.भ.प. भगवानबाबा आनंदगडकर महाराज यांच्यासह अनेक दिग्गज दापोलीकर येथे उपस्थित राहणार आहेत.पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांचा रविवार दि. ३ जून २०२४ रोजी ७५ वा. वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने लोकनेते गोपीनाथजी मुंडे प्रतिष्ठान, जालगाव यांच्यावतीने सकाळी १०.३० वाजता जालगाव येथे श्रीशैल सभागृहात अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणार्‍या पाच संस्था व पाच व्यक्ती यांना पद्मश्री कर्मवीर दादासाहेब इदाते सामाजिक समरसता प्रेरणा पुरस्कार प्रदान, तसेच लेखिका सौ. निलिमा देशपांडे लिखित पद्मश्री कर्मवीर दादासाहेब इदाते यांचे जीवन चरित्र समरसतेचा वारकरी या पुस्तकाचे प्रकाशन माजी राज्यपाल पद्मभूषण राम नाईक व राष्ट्रसंत डॉ. ह.भ.प. भगवान बाबा आनंदगडकर महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button