निदान सेवा क्षेत्रातील मेट्रोपॉलिस हेल्थकेअरच्या रत्नागिरीतील नवीन प्रगत निदान प्रक्रिया केंद्राचे उदघाटन

निदान सेवा पुरवणारी भारतातील अग्रगण्य अंपनी मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लिमिटेडने रत्नागिरी येथील आपल्या प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. शहरात ही दुसरी प्रक्रिया प्रयोगशाळा सुरू झाली असून यामुळे आरोग्यसेवा सुलभता आणि तंत्रज्ञानातील उत्कृष्टता यात सुधारणा होणार आहे. अंदाजे ८५० चौरस फूट क्षेत्रात पसरलेल्या या ×अत्याधुनिक डायग्नोस्टिक सेंटरमध्ये दररोज २०० नमुन्यांपर्यंत प्रक्रिया होवू शकते. येथे मुलभूत पॅथॉलॉजीपासून प्रगत आण्विक निदानापर्यंत चाचण्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button