चिपळूणच्या नगर अभियंता केबिनसमोर युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी ठाण मांडले

चिपळूण शहरातील काही समस्यांबाबत चार महिन्यापूर्वी दिलेल्या निवेदनाला चिपळूण नगर पालिकेच्या बांधकाम विभागाने केराची टोपली दाखविली. यामुळे आक्रमक झालेल्या युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी थेट नगर अभियंत्यांच्या केबिनसमोरच बुधवारी सकाळी ठिय्या मांडला. हातात फलक घेत त्यांनी नगर अभियंता प्रणोल खताळ यांच्या कामकाजाविषयी तीव्र संताप व्यक्त करीत जाब विचारला. त्यांच्या या भूमिकेमुळे अधिकार्‍यांचीही धावाधाव उडाली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button