
आंबोली घाटात स्थानिक व बाहेरील पर्यटकांच्यात हाणामारी, २९ पर्यटकांविरोधात गुन्हा दाखल
आंबोलीत वर्षा पर्यटनाला सुरूवात झाली असून पर्यटकांचा ओढा वाढत आहे. त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी आंबोली घाटातील मुख्य धबधब्यावर कार्यरत असलेल्या पोलिसांसमक्ष किरकोळ कारणावरून पर्यटकांच्या दोन गटात राडा झाला. या प्रकरणी आंबोली पोलिसांनी गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) आणि सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथील दोन गटातील २९ पर्यटकांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार आबा पिलणकर यांनी दिली.मंगळवारी आंबोलीतील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गर्दी झाली होती. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास धबधब्यानजिक रस्त्यावर वाहन लावल्यावरून गडहिंग्लज येथून आलेले पर्यटक व सावंतवाडीतील पर्यटकांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर धावून जात राडा केला. www.konkantoday.com