श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा तर्फे 21 जूनला जागतिक योग दिन कार्यक्रम
रत्नागिरी प्रतिनिधी : श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या वतीने शनिवार दिनांक २१ जून रोजी सायंकाळी ४:३० वाजता श्री अंबिका योगाश्रम ठाणे, शाखा रत्नागिरीच्या सहकार्याने जागतिक योग दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीराम मंदिर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती उर्मिलाताई घोसाळकर या भूषविणार आहेत. अंबिका योगासनाच्या वतीने श्रीराम मंदिरात गेल्या वर्षभर दर मंगळवारी योगाच्या प्रात्यक्षिकांचे मार्गदर्शन केले जात असून या योगा प्रशिक्षण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त सहकार्य लाभत आहे. या शिबिरात प्रशिक्षित झालेले नागरिक जागतिक योग दिनाच्या दिवशी योगाची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कट्ट्याचे मुख्य संयोजक श्री. सुरेश विष्णू उर्फ अण्णा लिमये, सचिव श्री. सुरेंद्र घुडे.तसेच श्री. सुरेंद्र शेटे व श्री रमाकांत पांचाळ यांनी केले आहे.