प्रणाली तोडणकर -धुळप यांच्या शिष्या स्नेहल हिचे 2 मार्चला अरंगेत्रम स्वा. सावरकर नाट्यगृहात होणार भरतनाट्यमचे विशेष सादरीकरण

रत्नागिरी : नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या संचालिका आणि भरतनाट्यम नृत्यांगना सौ. प्रणाली तोडणकर- धुळप यांची शिष्य सौ. स्नेहल कळंबटे -नागले यांच्या अरंगेत्रम हा कार्यक्रम रविवार दि. 2 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता रत्नागिरी शहरातील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे.

सौ. स्नेहल या गेली 14 वर्षे भरतनाट्यम नृत्याचा सराव करत असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून 2019 मध्ये गुरु सौ. प्रणाली तोडणकर- धुळप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशारद पूर्ण केले आहे. स्नेहल यांचे शिक्षण बीएससी, बीएड मध्ये झाले आहे. सध्या सरस्वती अकॅडमी आणि सरस्वती भरतनाट्यम नृत्य अकादमी यशस्वीरित्या त्या चालवत आहेत. आधी पत्नी आणि त्यानंतर आई अशी संसारिक जबाबदारी यशस्वीपणे पार पडत असतानाही आपल्या नृत्य कलेची उपासना त्याच जिद्दीने त्यांनी जपली आहे. नॅशनल स्पोर्ट्स डान्स स्पर्धेमध्ये सुवर्णपदक, नृत्य अनुभूती नॅशनल डान्स कॉन्टेस्ट अँड फेस्टिवल मध्ये सेकंड प्राईस , नटराज करंडक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तसेच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचा सहभाग होता. प्रयास 100 आणि प्रभू रामचंद्र नृत्यकथा या कार्यक्रमांमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता.

सौ स्नेहल या त्यांचे आई-वडील आणि पतीच्या भक्कम पाठिंबामुळे आजवर येऊन पोहोचल्या असून नृत्य शिक्षणाच्या प्रवासातील शिष्यांचे गुरुजनांच्या आज्ञेनुसार रंगमंचावरील पहिले पाऊल असलेल्या ‘अरंगेत्रम’ त्या 2 मार्च रोजी सादर करणार आहेत. सौ. स्नेहल यांच्या गुरु सौ. प्रणाली तोडणकर – धुळप यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम अभ्यासक्रमातील पहिला टप्पा पूर्ण करून त्या अरंगेत्रम सादर करणार असून यावेळी भरतनाट्यम अभ्यासक नृत्य चंद्रिका संयोगिता पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

तर यासाठी व्यंकटेश के. एन ., शन्मुध सुंदरम, सतीश शेशद्री आणि कार्तिक भट यांची मृदंगम, गायन, व्हायोलिन आणि बासरी साठी साथसंगत होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन सौ. अनघा निकम – मगदूम या करणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सौ. स्नेहल कळंबटे- नागले यांना त्यांच्या पुढील नृत्य शिक्षणासाठी शुभेच्छा द्यावा असं आवाहन नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या संचालक सौ. प्रणाली तोडणकर धुळप यांनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button