कोकण रेल्वेत फुकट्या प्रवाशांकडून दंडाच्या स्वरूपात 21 कोटी रुपये वसूल करणाऱ्या टीसींचा विशेष सत्कार
कोकण रेल्वे मार्गावर गेल्या वर्षभरात तिकिटाविना प्रवास करणाऱ्यावर रोख लावण्यासाठी कोकण रेल्वेच्या तिकीट तपासनीसांनी विशेष कार्य केले आहे. या आर्थिक वर्षात फुकट्यांकडून सुमारे २१ कोटी १७ लाख ८० हजार ७४१ रुपयांचा दंड वसूल केला. तिकीट तपासनीसांच्या या कार्याबद्दल त्यांचा रेल्वे प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून कोकण रेल्वेच्या मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या अंतर्गत कोकण रेल्वेच्या मार्गावर काम करणाऱ्या तिकीट तपासनिसानी चांगली कामगिरी करत ७८ हजार ११५ कारवाया केल्या. त्यातून २१ कोटी १७ लाखाचा दंड वसूल करण्यात आला.गेल्या आर्थिक वर्षात मार्गावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व तिकीट तपासनिसांना कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. झा यांनी गेल्या आर्थिक वर्षात तिकीट तपासनिसानी केल्या कामगिरीचे कौतुक केले.www.konkantoday.com