
काहीच दिवसांपूर्वी आपणही मोदीजींनाच पाठिंबा दिला होतात. तेव्हा काय काढलं होतं ?- मनसे नेते राजू पाटील
लोकसभा निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. या पाठिंब्यावरून राज ठाकरे यांच्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी टीका केली.मला विरोध करण्यासाठी काहींनी बिनशर्ट पाठींबा दिला अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवली होती. आता याला मनसेच्या नेत्याकडून उत्तर देण्यात आलं आहे. लबाड लांडगं ढ्वांग करतंय असं म्हणत मनेसे नेत्याने जोरदार टीका केलीय.”डोक्याला गुंडाळलेले कंबरेचं काढून ‘शर्त’ आणि ‘शर्ट’ असले फुटकळ शब्दच्छल करतात. ‘दादू’ काहीच दिवसांपूर्वी आपणही मोदीजींनाच पाठिंबा दिला होतात. तेव्हा काय काढलं होतं ? असा प्रश्न मनसे नेते राजू पाटील यांनी सोशल मीडियावरून विचारला आहे. यासोबत उद्धव ठाकरेंचे व्यंगचित्रही शेअर केले आहे. उद्धव ठाकरे यांनीही याआधी पाठिंबा दिल्याची आठवण मनसे नेत्यांनी करून दिली.उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं की, ‘या निवडणुकीमुळे पण एक गोष्ट बरी झाली. आपले कोण आणि परके कोण आहे, मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्ट झाले. काही जणांनी उद्धव ठाकरे नको म्हणून पंतप्रधान मोदींना बिनशर्ट पाठिंबा दिला. अरे उघड पाठिंबा म्हणजे, बिनशर्ट पाठिंबा दिला ना. मग बरोबर आहे की चूक आहे. नाही नाही उद्धव ठाकरे नको, हा बघा मी शर्ट काढला आहे. उघड पाठिंबा देत आहे. काही जणांना नाटक करण्यासाठी पाठिंबा दिला. ही नाटकं मोदींना जमतात आम्हाला जमत नाही.www.konkantoday.com