
३२५ कोटींचा ठेवीचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट ठरवून स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव वृद्धीमासाचा २० जून रोजी प्रारंभ
प्रतिवर्षी २० जून ते २० जुलै हा ठेव वृद्धीमासाचा परिपाठ निश्चित केलेल्या स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव वृद्धीमासाचा प्रारंभ होत आहे. संस्थेच्या ठेवी ३२५ कोटी पार करण्याचे उद्दिष्ट या ठेव वृद्धीमासाचा उत्सव स्वरूपांनंद पतसंस्था आपल्या १७ शाखांमध्ये साजरा करणार आहे. या ठेव वृद्धीमासात मूळ ठेवीदारांच्या संख्येत अधिक १० टक्के ठेवीदार वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवून टीम स्वरूपानंद सज्ज झाली आहे. या निमित्ताने संस्थेने १२ ते १८ महिनेची मुदतीची स्वरŠपांजली ठेव योजनेमध्ये सर्वसाधारण ८.०० टक्के व महिला / ज्येष्ठनागरीक यांचेसाठी ८.२५ टक्के व तसेच १९ ते ६० महिने मुदतीच्या सोहम ठेव योजनेमध्ये सर्वसाधारण ८.२५ टक्के व महिला व ज्येष्ठ नागरीक यांचेसाठी ८.५० टक्के एवढा व्याजदर देऊ केला आहे. यावर्षी राष्ट्रीय सहकार विकास निगम या केंद्रशासन अंगीकृत अस्थापनेने स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला गौरवांकित केले असल्याच्या पार्श्वभूमीवर ठेव वृद्धीमासाच्या उत्सवाचे उत्तम सादरीकरण व्हावे असा प्रयत्न राहणार आहे. ३१० कोटींच्या ठेवी, २१९ कोटींची कर्जे, ४३ कोटींचा स्वनिधी ९९.५१% विक्रमी वसुली, ० टक्के NPA, २४% सीआरएआर अशी आदर्श प्रमाणे आणि उत्तम आकडेवारी घेऊन स्वरूपानंद ठेव वृद्धीमासाचा प्रारंभ करत आहे. स्वरूपानंद पतसंस्थेने विश्वासार्ह प्रतिमा जनमानसात कोरली असून प्रतिवर्षीप्रमाणे या विश्वासार्ह, शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण काम करणाऱ्या संस्थेमध्ये गुंतवणूक करण्याची संधी ठेवीदार साधतील असा विश्वास अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव वृद्धीमासात ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणावर ठेव गुंतवून आकर्षक सुरक्षित व्याज परताव्याचा लाभ घ्यावा असे विनम्र आवाहन अॅड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
