आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये जाणार

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये जाणार, हे आता स्पष्ट झालं आहे. स्वत: खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत पुढील १५ दिवसांत मी स्वगृही परतत असल्याची माहिती दिली आहे.माझ्या संकटाच्या काळात शरद पवार यांनी मला साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, पण आता मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.भाजप प्रवेशाच्या घडामोडीबद्दल बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, “माझी भाजपमधील जुन्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांसोबत अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. त्यांचं म्हणणं होतं की मी पुन्हा भाजपमध्ये यायला हवं. मात्र मी याबाबतचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचं त्यांना कळवलं होतं. परंतु मी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आणि पुढील १५ दिवसांच्या आत माझा भाजप प्रवेश होईल,” अशी माहिती खडसे यांनी दिली आहे.www.konkantoday com

Related Articles

Back to top button