आश्वासनानंतर जिल्हा परिषदेच्या तेर्ये शाळेत अखेर बसले विद्यार्थी
जिल्हा परिषद तेर्ये शाळा क्र. १ मध्ये शिक्षण विभागाच्यावतीने पालक व ग्रामस्थांची चर्चा करून बदली शिक्षक तसेच वरदहस्त मुख्याध्यापिकेऐवजी दुसरा शिक्षक देण्याचे आश्वासन दिले. यानंतर पालक आणि ग्रामस्थांनी पुकारलेले शाळा बंद आंदोलन तात्पुरते मागे घेत अखेर विद्यार्थ्यांना शाळेत बसवले.संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये येथील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर १ मधील विद्यार्थ्यांने गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून शाळेतील विद्यार्थी रूद्र आनंद घवाळी (इरत्ता तिसरी) याला शाळेच्या मुख्याध्यापकांनी मारहाण केली होती. तसेच शाळेतील आणखी काही विद्यार्थ्यांच्या मुख्याध्यापकांविरूद्ध तक्रारी होत्या.www.konkantoday.com