संजय राऊत सर्वात मोठा डोमकावळा- मंत्री दादा भुसे
शिवसेना पक्षाचा उद्या 58 वा वर्धापन दिन आहे. एकीकडे या वर्धापन दिनाची उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे दोनही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वर्धापनदिनावरून कलगीतुरा रंगला आहे. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी वर्धापनदिनावरून शिंदे गटावर तोफ डागली. तर आता मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. सर्वात मोठा डोमकावळा तर संजय राऊत आहे. घाबरतो का मी त्याला, असा एकेरी उल्लेख करत दादा भुसे यांनी संजय राऊत यांना डिवचले आहे. शिवसेना पक्षाच्या स्थापनेवेळी आम्ही गोधडीत होतो. तर राऊत कुठे होते. ते तर कारकूनी करत होते. आता त्यांना वेगळ्या पदाचे वेध लागले आहेत. पक्षाचे विचार आम्ही सोडलेले नाहीत. जिथे जिंकून येतात तिथे ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला जात नाही. पराभव झाला की लगेच ईव्हीएमकडे बोट दाखवल जाते. पुढील चार महिनेही असाच खोटा नेरेटिव्ह सेट केला जाणार आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. www.konkantoday.com