
रत्नागिरी शहरातील हयात नगर मधील चोरी शेजारणीनेच केली, 24 तासात गुन्हा उघड
रत्नागिरी शहराजवळ हयात नगर मधील फ्लॅटमध्ये झालेली चोरी शेजारणीनेच केल्याचे उघड झाले आहेरत्नागिरी शहरातील हयातनगर हाऊसिंग सोसायटीमधील फ्लॅट अज्ञात चोरट्याने फोडून फ्लॅटमधील सुमारे 82 हजाराचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हयातनगर हाऊसिंग सोसायटी मधील फ्लॅट न 303 चा दरवाजाला लावलेले कुलुप काढून घरात प्रवेश करत घरातील बेडरुम मधील लाकडी बेडमध्ये ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवलेले 30 हजार रुपयांची एक सोन्याची बांगडी, 16 हजाराचे कानातील जोड, 12 हजाराची चेन असा 82 हजाराचा मुद्देमाल चोरी झाला होता. या प्रकरणी सफुरा जाविद डांगे (43) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाी शहर पोलिसांनी शेजारील राहणार्या संशयित महिलेला अटक केली आहे संशयित महिलेने फिर्यादी डांगे यांच्याकडून 2 महिन्यांपूर्वी कुलूप मागून नेले होते. त्या कुलुपाची डुप्लिकेट चावी बनवली आणि सोने आणि रोख रक्कम असा 82 हजार चोरी केली होती पोलीस निरीक्षक महेश तोसकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर हरमालकर आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक सावंत यांनी 24 तासात चोरी उघडकीला आणली