मत्स्यप्रेमींचा आकडता हात, माशाचे दर कडाडले
शासनाच्या नियमाप्रमाणे 1 जुनपासून समुद्रातील मासेमारी बंद करण्यात आली. त्यानंतर खाडीमध्ये मासेमारीला सुरवात झाली. पावसाला किनारी भागात येणारे मासेही सापडू लागले आहेत. या माशांचे प्रमाण कमी असल्याने खवय्यांची पंचाईत झाली आहे. रत्नागिरी शहराजवळील राजीवडा आणि मिरकरवाडा बंदरावर माशांची खरेदी-विक्री मोठ्याप्रमाणात होते. हंगामामध्ये ताजे मासे खरेदीसाठी अनेकजणं सकाळी व सायंकाळी तिथे हजेरी लावतात. रविवारी (ता. १६) गेलेल्या खवय्यांना माशांचे दर चांगलेच वधारलेल पहायला मिळाले. मासे खरेदी करताना अनेकांच्या खिशाला चाट बसत आहेwww.konkantoday.com