
महाराष्ट्रात ३ मार्गावर धावणार स्लिपर वंदे भारत एक्स्प्रेस? मुंबईतून दिल्लीही अवघ्या काही तासांवर!
भारताच्या रेल्वे इतिहासात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. देशातील पहिली स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे अनावरण बेंगळुरूमध्ये करण्यात आलं असून अत्याधुनिक सुविधांनीयुक्त असलेल्या डब्यांनी प्रवाशांना एक नवीन प्रवास अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. या ट्रेनची सध्या चाचणी सुरू असून या चाचण्या दहा दिवस चालणार आहेत. ज्यामध्ये सॉफ्टवेअर, तांत्रिक उपकरणे, आणि यंत्रणांची तपासणी केली जाणार आहे.*रेल्वेच्या प्रवासातील हा एक मोठा टप्पा असून स्लीपर वंदे भारत ट्रेनमुळे राजधानी एक्स्प्रेस सारख्या लोकप्रिय गाड्यांना एक पर्याय उपलब्ध होणार आहे. वंदे भारत ट्रेनचे खासियत म्हणजे 160 किमी प्रति तास वेग. या चाचण्यां पूर्ण झाल्यानंतर वंदे भारत मुंबई ते दिल्ली मार्गावर धावण्याची शक्यता आहे.*मुंबई ते दिल्ली दरम्यान वंदे भारतचा वेग वाढणार*राजधानी एक्स्प्रेस मुंबई ते दिल्लीपर्यंतचा प्रवास सुमारे 16 तासांत पूर्ण करते. मात्र, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अनावरणाच्या वेळी जाहीर केले की भविष्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन 12 तासांत हा प्रवास पूर्ण करू शकणार आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे ‘मिशन रफ़्तार’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे गाड्यांचा वेग 160 किमी प्रति तास वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.मुंबई ते दिल्ली हा 1,478 किमीचा मार्ग असून या प्रकल्पासाठी 8 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पश्चिम रेल्वेचे क्षेत्रातील या प्रकल्पाशी संबंधित काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. गाड्यांचा वेग अधिक सुरक्षितपणे वाढवता यावा यासाठी जनावरे आणि जंगली प्राण्यासाठी कुंपण आणि पटर्यांच्या दोन्ही बाजूंना भिंती उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.*’कवच’ तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता*वंदे भारत ट्रेनच्या वेगात वाढ होत असताना, गाड्यांच्या सुरक्षिततेलाही महत्त्व दिले जात आहे. यासाठी भारतीय रेल्वेने ‘कवच’ नावाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग गाड्यांना एकमेकांशी धडक होण्यापासून रोखण्यासाठी केला जातो. गाड्यांमध्ये कवच लावल्याने, जर कधी गाड्या समोरासमोर धावू लागल्या तर आपोआप ब्रेक लागतील आणि दुर्घटना टाळली जाईल.पश्चिम रेल्वेवर या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी झाली असून वडोदरा-अहमदाबाद, विरार-सूरत, आणि वडोदरा-रतलाम-नागदा या सेक्शनमध्ये चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. हा तंत्रज्ञान रेल्वे सुरक्षा क्षेत्रात एक मोठी क्रांती ठरण्याची शक्यता आहे.