
किरण सामंत यांच्या प्रयत्नाने दांडे-अणसुरे पूल १५ दिवसात वाहतुकीस खुला
सागरी महामार्गावरील सिंधुदुर्ग-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील दांडे-अणसुरे पुलाच्या दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाचे रखडलेले काम लवकरात लवकर मार्गी लागावे आणि होणारी जनतेची गैरसोय दूर व्हावी यासाठी सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली होती. सध्या युद्धपातळीवर हे काम सुरू असून येत्या पंधरा दिवसात हे काम पूर्ण होवून हा पुल वाहतुकीस खुला करण्यात येणार असल्याची माहिती शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले यांनी दिली.दांडे-अणसुरे पुलाच्या दुरूस्तीचे कामाच्या ठिकाणी दीपक नागले यांनी भेट देत पाहणी केली. या पावसाळ्यात या पुलावरून सुरळीत वाहतूक सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून हे काम वेळीच पूर्ण व्हावे, यासाठी सिंधुरत्न समितीचे सदस्यय किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पाठपुरावा करीत होतो. आता हे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या पंधरा दिवसात हा पूल वाहतुकीस खुला होईल, असा विश्वास नागले यांनी व्यक्त केला. त्यामुळे जनतेची होणारी गैरसोय दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. www.konkantoday.com