
गुहागर तालुक्यातील सडे जांभारी येथे पतीचा मित्र असल्याचे भासवून ग्रामसेविकेची ६७ हजारांची फसवणूक
रत्नागिरी जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार घडतच आहेत सायबर गुन्हेगार विविध क्लुप्त्या लढवत असल्याने नागरिकांचे आर्थिक फसवणूक होत आहेगुहागर तालुक्यातील सडे जांभारी येथील ग्रामसेविकेची ६७ हजार ५०० रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या फसवणूक प्रकरणात पतीचा मित्र असल्याचे भासवले हजारो रुपये उकळले. याप्रकरणी गुहागर पोलिस स्थानकात एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ८ मे २०२४ रोजी दुपारी आबलोली-काष्टे वाडी येथे घडला. याप्रकरणी अपूर्वा अमोल हुमणे (३८) यांनी फिर्याद दिली आहे.अपूर्वा हुमणे यांना अमरेश कुमार नावाच्या व्यक्तीने मोबाइलवरून फोन करून त्यांच्या पतीचा मित्र असल्याचे सांगितले. त्यानंतर अपूर्वा हुमणे यांच्या खात्यावर पैसे पाठवायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने हुमणे यांच्या खात्यामध्ये १० हजार, २५ हजार आणि दोनवेळा ४५ हजार रुपये अशी रक्कम हस्तांतरित केल्याचे खोटे मेसेज पाठविले. त्यानंतर त्याने बँक ऑफ इंडियाच्या गुहागर शाखेतील खात्यातून ६७,५०० रुपये मोबाइल क्रमांशी कनेक्ट असलेल्या दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगितले. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अपूर्वा हुमणे यांनी थेट गुहागर पोलिस स्थानक गाठले. याप्रकरणी अमरेश कुमार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.www.konkantoday.com