
घरगुती सिलिंडरच्या स्फोटात दापोलीत पती-पत्नी जखमी
. दापोली शहराला लागूनच असणार्या रूपनगर येथे घरगुती सिलिंडरचा स्फोट होवून पती-पत्नी भाजले असून त्यांना हलवण्यात आले आहे. स्फोटाची दुर्घटना शुक्रवारी दुपारी २.३० वाजता घडली. हा स्फोट एवढा मोठा होता की, त्यामुळे घराच्या हॉलची भिंत कोसळली. सुदैवाने लहान मुले शाळेत गेली असल्यान अनर्थ टळला. अविनाश श्रीकांत शिर्के (३५) व अश्विनी अविनाश शिर्के (३०) अशी स्फोटात जखमी झालेल्यांची नावे आहेत.