काजू, सुपारी, नारळाची लागवड रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 10 हजार 620 हेक्टर क्षेत्राने वाढली
वर्षानुवर्षे उत्पन्न देणारी काजू, सुपारी, नारळाची लागवड जिल्ह्यात वाढत आहे. गेल्या दहा वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 10 हजार 620 हेक्टर क्षेत्राने ही लागवड वाढली आहे.जिल्ह्याच्या मंडणगड आणि दापोली तालुका वगळता इतर सात तालुक्यांमध्ये काजू, सुपारी, नारळ लागवडीचे क्षेत्र वाढले आहे.काजू, सुपारी आणि नारळ ही पिके वर्षाचे बाराही महिने वापरात असतात. काजू पीक खडकाळ आणि डोंगर उतारावर चांगल्या प्रमाणात येते. जांभ्या दगडापासून निर्माण झालेल्या तांबड्या जमिनीत हे पीक बहरत जाते. त्याचबरोबर सुपारी आणि नारळाची लागवड किनारपट्टीत चांगल्या प्रकारे होतेे. जिल्ह्यात ही पिके घेण्यासाठी चांगले वातावरण असल्याने लागवडीखालचे क्षेत्र वाढू लागले आहेwww.konkantoday.com