रवींद्र वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फोन पोलीस स्टेशनमधून- संजय राऊत
रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याने मतमोजणीवेळी मोबाइलचा वापर करून ओटीपीद्वारे ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप विरोधकांनी केला.अपक्ष उमेदवार भरत शाह आणि मोहन अरोरा यांच्या तक्रारीवरून याप्रकरणात वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर व निवडणूक कर्मचारी दिनेश गुरव यांच्यावर गुन्हा दाखल झाला.ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावरून पुन्हा एकदा रवींद्र वायकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही. वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न झाला” असं म्हणत निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.वनराई पोलीस स्टेशनचे पी आय राजभर हे अचानक रजेवर का गेले? वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फ़ोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न झाला. वायकर यांचा खास माणूस (जो त्यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते) retd. पी आय सातारकर हे वनराई पोलीस स्टेशनमध्ये चार दिवसांपासून काय डील करत होते? वनराई पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज लगेच जप्त करुन चौकशी केली पाहिजे.”www.konkantoday.com