कोकण विकास समितीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाला सूचवले पर्याय
गणेशोत्सवासाठी चाकरमानी लाखोंच्या संख्येने गावी डेरेदाखल होतात. यामुळे रेल्वेसह रस्ते वाहतुकीवर ताण निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर कोकण विकास समितीने गणेशभक्तांच्या निर्विघ्न प्रवासासाठी रेल्वे बोर्डाला काही पर्याय सुचवत रेल्वेगाड्याही दादर, ठाणे स्थानकापर्यंत चालवण्याचा आग्रह धरला आहे.दिवा-रोहा मेमूचा विस्तार करण्याऐवजी किंवा पनवेल ते चिपळूण दरम्यान वेगळी रेल्वेगाडी चालवण्याऐवजी मुंबई सीएसएमटी ते चिपळूण दरम्यान अनारक्षित गाड्या चालवाव्यात, या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगांव, गोरेगाव, वीर, सापेबामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रूक, खेड, आंजणी स्थानकात थांबे द्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.तसेच या गाड्या द्वितीय श्रेणी व चेअरकार कोच सोयीचे पडतील. पनवेल स्थानक बहुतेक प्रवाशांना सोयीचे ठरत नाहीत. यामुळे मुंबई शहर व उपनगरातील गणेशभक्तांच्या सोयीसाठी या गाड्या किमान दादर व ठाणे स्थानकापर्यंत चालवणे गरजेचे आहे. चिपळूण-रत्नागिरी दरम्यान दिवसा धावणार्या गाड्यांसाठी सेकंड स्लीपर एस.एल. किंवा थ्री टायर एसी ३ ए डब्यांचे रूपांतर सेकंड सीटींग २ एस तसेच एसी चेअर कार सीसी कोचमध्ये केल्यास जास्त प्रवाशी प्रवास करू शकतील. या मागण्यांचा प्राधान्याने विचार करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. www.konkantoday.com