
कोकण मार्गावर धावणारी कोच्युवेली-एलटीटी गरीबरथ धावणार नव्या रंग रूपात
कोकण मार्गावर धावणारी कोच्युवेली-एलटीटी गरीबरथ एक्सप्रेस आता नव्या रंग रूपात धावणार आहे. आरामदारी मानल्या जाणार्या अत्याधुनिक प्रणालीच्या डब्यांसह २३ जूनपासून धावणार असल्याने पर्यटक कमालीचे सुखावले आहेत. पोरबंदर-कोच्युवेलीसह एर्नाकुलम-ओखा एक्सप्रेस पाठोपाठ गरीबरथ एक्सप्रेसचे रूपडे पालटणार आहे.भारतीय रेल्वेने जुन्या रेल्वेगाड्यांच्या तुलनेत एलएचबी श्रेणीतील रेल्वेगाड्यांचा प्रवास आरामदारी अन सुरक्षिततेच्या दृष्टीने तितकाच किफायतशीर करण्याच्यादृष्टीने ठोस पावले उचलली आहेत. रेल्वेच्या या धोरणानुसार कोकण रेल्वे मार्गे धावणारे २०९१०/२०९०९ क्रमांकाची पोरबंदर-कोच्युवेली साप्ताहिक एक्सप्रेसही २८ मार्चपासून एलएचबी श्रेणीच्या नव्या रंगरूपातील डब्यांची धावत आहे. www.konkantoday.com