दरवाजा उघडा असे आम्ही त्यांना सांगितले नाही-शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत
शनिवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उबाठा) या तिन्ही पक्षांची प्राथमिक बैठक झाली. या बैठकीत लोकसभेपेक्षा अधिक ताकदीने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची माहिती महविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतून दिली. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.काय म्हणाले उदय सामंत?ज्यांना जनतेने बेदखल केले त्यांच्या बोलण्याची आम्ही दखल घेणार नाही. हे मनोज जरांगे पाटील यांच्या साक्षीने सांगतो, असा पलटवार मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. दरवाजा उघडा असे आम्ही त्यांना सांगितले नाही. आम्ही जाणार, आम्हाला घेणार असे काही चित्र नाही. उलट शिंदे साहेबांचादरवाजा अनेकांसाठी उघडा आहे. त्यांचे अनेकजण आमच्याकडे येतील. मतांची सूज त्यांना आली आहे असे दिसते. स्वतः ठाकरेंचे लोक आमच्या संपर्कात आहे. म्हणून ते झाकण्यासाठी असे बोलत असल्याचा टोला सामंत यांनी लगावला.www.konkantoday.com