बेनी नदी येथील गणपती विसर्जन घाटाकडे जाणारा रस्ता प्रशासनाने केला तयार

लांजा शहर परिसरासह मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन होणार्‍या न.प. प्रभाग क्र. ३ मधील बेनी नदी येथील गणपती विसर्जन घाटाकडे जाणारा रस्ता अखेर महामार्ग प्रशासनाने तयार करून दिला आहे.लांजा न.प. प्रभाग क्र. ३ मधील बेनी नदी येथील गणपती विसर्जन घाट या ठिकाणी लांजा शहरासह अन्य परिसरातील मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन होते. असे असले तरी मुंबई-गोवा महामार्ग ठेकेदार कंपनीने या गणपती विसर्जन घाटाकडे जाणारा रस्ता तयार केला नव्हता, प्रभाग क्र. ३ मधील नगरसेविका दुर्वा प्रसाद भाईशेट्ये यांनी मागणी करूनही महामार्ग ठेकेदार कंपनी व हायवे प्रशासन दुर्लक्ष करत होते. त्यानंतर ही बाब किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तसेच स्वतः किरण सामंत यांनी संबंधित स्थळाची पाहणी केली. यावेळी हायवे प्रशासनाला धारेवर धरले व त्वरित रस्ता करून देण्यास सांगितले होते. दरम्यान किरण सामंत यांनी दिलेल्या आदेशाने हायवे प्रशासनाच्यावतीने तातडीने रस्ता तयार करून देण्यात आला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button