गद्रे इंग्लिश मिडियम सेकंडरी स्कूलविरोधात पालकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने विद्यार्थ्यांना मिळाले गुणपत्रक
शालेय शुल्क शिल्लक असल्याचे कारण देत विद्यार्थ्यांचे दहावीचे गुणपत्रक आणि दाखले देण्यास टाळाटाळ करणार्या गद्रे इंग्लिश मिडियम सेकंडरी स्कूलविरोधात पालकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर स्कूल प्रशासनाला अखेर दाखले देण्यास भाग पाडले आहे. शिक्षण उपसंचालक व पोलिसांच्या मध्यस्थीमुळे बुधवारी विद्यार्थ्यांना गुणपत्रक मिळाले, तर गुरूवारी दुपारी ३ वाजता दाखले देण्याची हमी देण्यात आली.कोरोना कालावधीपासून या शाळेतील १८ विद्यार्थ्यांचा शालेय शुल्काचा प्रश्न प्रलंबित आहे. या शुल्काविरोधात पालक व संस्था न्यायालयात गेलेली आहे. दहावीची परीक्षा झाल्यानंतर तिथे गुणपत्रक आणि शालेय दाखला देण्यासाठी संस्थेने मंगळवारी दुपारी ३ वाजता पालकांना शाळेत बोलावले होते. त्यानुसार पालक शाळेत गेल्यानंतर मुख्याध्यापक हजर नसल्याने उपमुख्याध्यापिका येसादे यांच्याकडे दाखल्याची मागणी केली. मात्र प्रलंबित शुल्काचे कारण देत दाखले दोन दिवसात देवू असे सांगण्यात आले. मात्र शुल्काचा विषय न्यायालयात असल्याने दाखले दिल्याशिवाय हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा पालकांनी घेतला.अखेर पोलीस उपनिरीक्षक पंकज खोपडे आपल्या सहकार्यांसह शाळेत आले. त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु योग्य निर्णय होत नसल्याने त्यांनी पालक व शिक्षक प्रतिनिधींना पोलीस स्थानकात बोलावले. तेथे पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्या समोर चर्चा झाली व सन्मानजनक तोडगा काढण्यात आला. www.konkantoday.com