
पाकव्याप्त काश्मिर जिंकणे भारतास शक्य-लेन्फटंट जनरल (नि.) राजेंद्र निभोरकर*
___उरी एअर स्ट्राईकचे नेतृत्व आणि लष्कराच्या इतिहासात सर्वाधिक पदके मिळवणारे लेन्फटंट जनरल (नि.) राजेंद्र निभोरकर यांचे चित्तथरारक अनुभव ऐकण्याचे भाग्य शेकडो विद्यार्थी, पालक, शिक्षक, विद्वान मंडळींना मिळाले.निभोरकर म्हणाले, पाकव्याप्त काश्मिर जिंकणे भारतीय लष्कराला शक्य आहे. मात्र पाकव्याप्त काश्मिर जिंकायचा असेल तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. ही किंमत किती असेल, हे ठरल्यास अशक्य असे काहीच नाही. देशासाठी काहीही करायला सैनिक सदैव सज्ज असतात असे गौरवोदगार निभोरकर यांनी काढले.गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ऍड. विलास पाटणे लिखित झाशीची राणी लक्ष्मीबाई या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन गोगटे जोगळेकर महाविद्यालयात करण्यात आले. यावेळी निभोरकर बोलत होते.www.konkantoday.com