भाजपा महायुतीचे उमेदवार अॅड. निरंजन डावखरे यांच्या विजयासाठी पुन्हा एकदा मंत्री रवींद्र चव्हाण जोरदार तयारीनीशी मैदानात उतरले
लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे आताकोकण पदवीधरसाठी भाजपा महायुतीचे उमेदवार अॅड. निरंजन डावखरे यांना उमेदवारी देण्यात आलेली असून, महायुतीकडे प्रचंड मोठी कार्यकर्त्यांची फौज आहे, कार्यकर्त्यांकडून निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी नियोजनबध्द कामाची आवश्यकता आहे असे मार्गदर्शन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालयात गुरुवारी महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रविंद्र चव्हाण यांनी मतदान कशापध्दतीने करायचे इथपासून मतदारांना कशा पध्दतीने मतदान केंद्रापयर्र्त येण्यासाठी प्रयत्न करायचे इथपर्यंत मार्गदर्शन केले. या मतदार संघात जवळपास सव्वादोन लाख पदवीधर मतदार आहेत. त्यांच्यापर्यंत उमेदवाराला जाता येणे शक्य नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनीच आपल्या जवळचे मतदार कोण आहेत. ते लक्षात घेऊन त्यांना आपल्या उमेदवाराची माहिती देऊन त्यांना मतदान करण्यासाठी घेऊन येण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्त्यांनी त्यासाठी जवळच्या लोकांची यादी तयार करुन, मतदारांच्या सवडीनुसार त्यांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीमध्ये अॅड. डावखरे यांना निवडूनआणण्यासाठी कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष देऊन काम करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी अॅड. डावखरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना मागील बारा वर्षात आपण पदवीधरांसह मतदारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सांगितले.यावेळी उमेदवार अॅड. निरंजन डावखरे, माजी आमदार बाळ माने, माजी आमदार डॉ. विनय नातू, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेनेचे नेते किरण सामंत, भाजपाचे राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर, युवानेते अनिकेत पटवर्धन, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, शिवसेना जिल्हाप्रमुख राहूल पंडीत, शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, सुदेश मयेकर यांच्यासह महिला पदाधिकारी निलम गोंधळी, जिल्हाध्यक्षा सौ. साळवी यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचेपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.