
तुतारी एक्सप्रेसमधून प्रवास करणार्या रेल्वे प्रवाशाची ४० हजार रुपये असलेली बॅग चोरीस
तुतारी एक्सप्रेसमधून प्रवास करणार्या रेल्वे प्रवाशाची ४० हजार रुपये असलेली बॅग चोरीस तुतारी एक्सप्रेस या रेल्वेगाडीतून दादर ते रत्नागिरी असा प्रवास करणार्या प्रवाशाची ४० हजार रुपये रोख तसेच कागदपत्रे असलेली बॅग चोरट्याने चोरल्याची घटना मंगळवारी सावर्डे रेल्वेस्थानकादरम्यान उघडकीस आली. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या बाबतची फिर्याद योगेश सुरेश मेस्त्री (३७) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश मेस्त्री हे तुतारी एक्सप्रेसमधून दादर ते रत्नागिरी असा प्रवास करत होते. ही रेल्वे सावर्डे रेल्वेस्टेशन येथे आली असताना त्यांची रोख रक्कम ४० हजार तसेच कागदपत्रे असलेली बॅग चोरट्याने चोरून नेली. हा प्रकार मेस्त्री यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सावर्डे पोलिसांत अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला. www.konkantoday.com