
रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावरील काळबादेवी, कुणकेश्वर पूल बांधकामाचा फुटणार नारळ
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावर असलेल्या कुणकेश्वर आणि काळबादेवी येथील दोन नवीन पुलांच्या बांधकामासाठी कंपनी ठरली आहे. सर्वात कमी बोलीदार म्हणून विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी काळबादेवी सागरी पुलासाठी २९१६४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.पर्यटनाला चालना देणार्या रेवस-रेड्डी सागरी किनारा मार्ग प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतला आहे. या सागरी महामार्गासाठी नऊ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा सागरी महामार्ग २०१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडे तर २३ ऑक्टोबर २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. या महामार्गावरील खाड्या आणि नद्या ओलांडण्यासाठी किमान ८ नवीन पुलांची उभारणी करण्यात येणार आहे.www.konkantoday.com