
जिल्हा परिषदेने ठोस भूमिका न घेतल्याने रायपाटण केंद्र शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांविना
जिल्हा परिषदेचा कोणताही ठोस निर्णय अथवा भूमिका नसल्याने शनिवारी शाळेच्या पहिल्या दिवशी राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील केंद्रशाळा रायपाटण नं. एकमध्ये पालक व ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलन छेडले. शाळेच्या जागेच्या मालकीचा प्रश्न गेली अनेक वर्षे जि.प. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे भिजत पडला असल्याचा आरोप करीत सरपंच निलेश चांदे यांनी या प्रकरणी जिल्हा परिषदेने यंदा पुढाकार न घेतल्यास १५ जूनपासून गावातील विद्यार्थ्यांना शाळेतच पाठविणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना सविस्तर निविेदन सादर केले होते.www.konkantoday.com