उपजिल्हाधिकारी यांचेवर हल्ला करण्याच्या प्रयत्नानंतर प्रशासन जागे
रत्नागिरी जिल्हा प्रशासनातील उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर वाळूमाफियांनी हल्ला केल्यानंतर येथील महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिलेल्या निर्देशानुसार येथील मंडळ अधिकार्यांनी पांढरा समुद्र किनार्यावर कारवाई करत तेथे वाळू भरलेली एक चारचाकी गाडी पकडली. या गाडीत पाऊण ब्रास वाळू आढळल्याने गाडीमालकाला ३७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.शहरातील पांढरा समुद्र येथे ७ जून रोजी मॉर्निंग वॉकला गेलेल्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम ययांच्यावर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. त्या हल्लेखोरांचा हल्ला गेडाम यांनी कराटे किक मारून परतवून लावत आपला बचाव केला होता. या समुद्रनिकार्यावर मोबाईलवर शूटींग करत असताना त्यावेळी समुद्रावर वाळूमाफिका वाळू चोरत होते. www.konkantoday.com