भास्करराव तुम्ही गृहमंत्री व्हा आणि येथील पोलीस यंत्रणा फक्त आमच्या ताब्यात द्या, मग बघा….नवनियुक्त जिल्हाप्रमुख संजय कदम

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची सत्ता तर येणारच आहे. रामदास कदमांचे पार्सल देखील आम्ही परत पाठवून देणार आहोत. पण भास्करराव तुम्ही गृहमंत्री व्हा आणि येथील पोलीस यंत्रणा फक्त आमच्या ताब्यात द्या, मग बघा….रामदास कदम यांची दादागिरी मोडून काढून संघटना कशी उभी करतो ते तुम्हीही बघाल, ५० हजाराचे मताधिक्य मिळवून देण्याची वलग्ना करणारे बामलावे आता कुठे शेपूट घालून बसलेत, आशा शब्दात नवनियुक्त जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी जोरदार वक्तव्य केले.चिपळूण येथील मतदार आभार मेळाव्यात ते संजय कदम हे बोलत होते. जिल्हाप्रमुख पद माझ्याकडे देऊन पक्षप्रमुखांनी माझ्यावर फार मोठा विश्वास दाखवला आहे. मी संघर्षातून पुढे आलेला कार्यकर्ता आहे. हे उद्धवजीना माहीत आहे. रामदास कदम ही घाण आम्हीच १९९० मध्ये येथे आणली. पण त्यावेळी केशवराव भोसले म्हणाले होते, काही वर्षाने हाच माणूस तुमचे आईबहीण काढेल. ते सत्य आज आमच्या समोर आले आहे. प्रत्येक गोष्टीत रामदास कदम त्रास देत आहेत. छोट्या-छोट्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. प्रशासनाला हाताशी धरून कार्यकर्त्यांवर केसेस, तडीपारच्या नोटीसा दिले जात आहेत. पण त्यांच्या दादागिरीला मी भीक घालत नाही. मी लढणारा कार्यकर्ता आहे.असेही कदम यांनी स्पष्ट केले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button