
कोकण रेल्वेने मेट्रो उभारणीच्या क्षेत्रात प्रवेश केला
कोकण रेल्वेने मेट्रो उभारणीच्या क्षेत्रात प्रवेश केला कोकण रेल्वेचे नूतन व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी मागील महिन्यात माध्यमांशी बोलताना सूतोवाच केल्याप्रमाणे कोकण रेल्वेने मेट्रो उभारणीच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळ आणि कोकण रेल्वे कॉर्पो. लि. यांच्यामध्ये नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार आता दिल्ली मेट्रो व कोकण रेल्वे एकत्रितपणे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मेट्रो प्रकल्पांवर एकत्रितपणे काम करणार आहेत. कोकण रेल्वेच्या वाटचालीत ही एक महत्वपूर्ण घटना मानली जात आहे.कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी मागील महिन्यात माध्यमांशी बोलताना भविष्यकाळ मेट्रो वाहतुकीचा असल्याचे सांगत दीर्घकालीन भविष्यकाळ पाहता कोकण रेल्वेने मेट्रो उभारणीच्या कामामध्ये सहभागी होण्याची गरज व्यक्त केली होती. त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही सांगितले होते. त्यावेळी सूतोवाच केल्याप्रमाणे काही दिवसातच दिल्ली मेट्रोशी हा सामंजस्य करार पार पाडला आहे. झा यांच्या मते तांत्रिक व सैद्धांतिक स्तरावर कोकण रेल्वे मेट्रो तंत्रज्ञान हाताळण्यास सक्षम आहे. तसेच वाढत्या शहरीकरणाबरोबर मेट्रो सेवेचाच अधिक विस्तार होणार आहे. त्यासाठी कोकण रेल्वे आताा सज्ज झाली आहे. www.konkantoday.com