कार्डिअ‍ॅक सर्जनलाच हृदयविकाराने गाठलं, रुग्णसेवा करतानाच डॉक्टर कोसळले, अवघ्या 39 व्या वर्षी जगाचा निरोप!

Cardiac Arrest : भारतातील युवा हृदयशल्यविशारद डॉ. ग्रॅडलिन रॉय यांचे कार्डिॲक अरेस्टने निधन झाले. ते फक्त 39 वर्षांचे होते. अनेकांसाठी देवदूत ठरलेल्या डॉक्टरलाच हृदयविकाराने गाठल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने वैद्यकीय विश्वालाही मोठे हादरे बसले आहेत. डॉक्टरांनी रुग्णांची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.

धक्कादायक म्हणजे डॉ. ग्रॅडलिन रॉय हे रुग्णांची सेवा करत असतानाच हृदयविकाराला बळी पडले. रुग्णालयात तपासणी करत असताना ते अचानक कोसळले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. रुग्णालयातच असल्याने सीपीआर, स्टेंटिंग, इंट्रा-एओर्टिक बलून पंप, ईसीएमओ यासारखे उपचार तातडीने मिळाले. परंतु सर्वांचे सर्वच प्रयत्न अयशस्वी ठरले.

डॉ. ग्रॅडलिन रॉय हे चेन्नईतील सविता मेडिकल कॉलेजमध्ये कन्सल्टंट कार्डिअॅक सर्जन म्हणून कार्यरत होते. त्यांनी नुकतीच स्वतःची स्वतंत्र प्रॅक्टिसही सुरु केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

दरम्यान, हैदराबादमधील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर महत्त्वाचा संदेश शेअर केला आहे. “जेव्हा डॉक्टर आजारी पडतात, तेव्हा डॉक्टरांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी तो एक सतर्कतेचा इशारा असतो. डॉ. रॉय यांचे निधन ही पहिली घटना नाही. याआधीही अनेक तरुण डॉक्टरांना हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे.

डॉ. कुमार यांच्या मते, वैद्यकीय तज्ज्ञांच्या कामाच्या स्वरुपामुळे त्यांना हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. डॉक्टरांना कामाचे तास खूप जास्त असतात. त्यांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांच्या शरीरावर ताण येतो.

रुग्णांचे जीव वाचवण्याची जबाबदारी, त्यांच्या अपेक्षा आणि कायदेशीर बाबींमुळे डॉक्टरांना सतत तणाव असतो. त्यामुळे ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकतात. ऑपरेशन थिएटरमध्ये उभे राहून किंवा दवाखान्यात बसून काम केल्यामुळे डॉक्टरांना व्यायाम करायला वेळ मिळत नाही. त्यांना वेळेवर जेवण मिळत नाही. ते जास्त चहा किंवा कॉफी पितात. नियमित आरोग्य तपासणी करत नाहीत. काही डॉक्टर धूम्रपान किंवा मद्यपान करतात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button