चिपळूण तालुक्यात पावसाचे आगमन तरीही ५८ वाड्या तहानलेल्याच
कोकणासह चिपळूण तालुक्यातही पावसाचे आगमन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. मात्र पावसाने कृपा केली असली, तरीही अद्याप नैसर्गिक पाण्याचे स्त्रोतांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध न झाल्याने तब्बल २० गावातील ५८ वाड्या तहानलेल्याच आहेत. या टंचाईग्रस्त वाड्यांना प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरूच राहिला आहे.www.konkantoday.com