
रत्नागिरीतील जयस्तंभ येथील नव्याने उभारण्यात आलेले सिग्नल लपताहेत झाडीत
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ सर्कल हे अतिशय वर्दळीचे सर्कल असून या ठिकाणी आता वाहतूक नियंत्रित करण्यासाठी नव्याने सिग्नल उभारण्यात येत आहेत या सिग्नल उभारणीचे काम आता संपत आले असून काल त्याची चाचणी घेण्यात आली मात्र यातील काही सिग्नल झाडीत लपत असल्याचे दिसत आहेत एसटी स्टँड करून जयस्तंभ येथे येण्यासाठी ओंकार पेपर स्टॉल येथे
सिग्नल च खांब उभारण्यात आला आहे मात्र त्या ठिकाणी मोठे झाड वाढलेले असल्याने हा सिग्नल दिसणे कठीण आहे वास्तविक जेल नाक्याप्रमाणे या ठिकाणी डिव्हायडरच्या मधोमध सिग्नल बसवला असता तर पेट्रोल पंपापासून हा सिग्नल स्पष्टपणे दिसला असता याबाबत संबंधीशी अशी चर्चा केली असता आपणाला नगरपरिषदेच्या इंजिनिअरने जागा ठरवून दिली त्याप्रमाणे आम्ही सिग्नलची उभारणी केली असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे नगरपरिषदेच्या इंजिनियरने उभारणी करताना पुढील अडचणी लक्षात घेतले नसल्याचे दिसत आहे एसटी स्टँड करून येणाऱ्या वाहन चालकांना हा सिग्नल लांबून दिसणे आवश्यक असेल तर सिग्नलच्या समोर आलेले झाड तोडणे आवश्यक बनले आहे त्यामुळे आता नगरपरिषद काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे
,www.konkantoday.com