
राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महाआरती उत्साहात संपन्न.
३१ मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त श्री. देव विश्वेश्वर मंदिर, राजीवडा येथे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष श्री राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा सौ वर्षा परशुराम ढेकणे यांच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरी शहर मंडळ दादा ढेकणे यांच्या वतीने भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी ९.३० वाजता ही महाआरती भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडली.या महाआरतीस भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा मोर्चा, तसेच स्थानिक कार्यकर्ते, नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर धार्मिक वातावरणाने भारावलेल होत.या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री निलेश आखाडे यांच्या माध्यमातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची आठवण करून देण्यात आली. त्यांच्या समाजसेवा, न्यायनिष्ठा व प्रशासन कौशल्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.