
पाईपलाईन साठी खुदाई झालेल्या रस्त्याचे काम केले नाही,राजापूरकर कॉलनी येथिल रस्ता गटारमय झाला
रत्नागिरी शहराजवळील उद्यान नगर भागात पाईपलाईन साठी खोदलेले रस्त्याचे पावसा आधी काम केले नसल्याने
उद्यम नगर रोडवरील
जुन्या पाईप फॅक्टरी पासून ओसवाल नगर पर्यन्त राजापूरकर कॉलनी येथिल रस्ता गटार मय झाला या रस्त्यावरून चालले मुश्किल झाले आहे या सर्वाला कारणीभूत शिरगांव ग्राम पंचायत आहे विशेष म्हणजे याच भागात सरपंच आणि सदस्य राहातात . काही महिन्यापासून गॅस पाईप लाईन आणि पाण्याची पाईप लाईन टाकताना दोन वेळा रस्ता खोदला गेला पण अद्याप पर्यंत त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने या रस्त्यावरून चालणे महा कठीण झाले आहे आणि आता पावसाळ्यात रस्त्याचे काम करणे शक्य नसल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे
www.konkantoday.com