पोस्टाच्या खातेदारांच्या खात्यावर शाखा डाकपालाचा डल्ला, ५४ हजारच्या रकमेचा अपहार, नाटे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
धाऊलवल्ली दसूर ता. राजापूर येथील डाकपाल विजय कृष्णा भोवड यांनी डाकपाल विभाग शाखा धाऊलवल्ली येथील खातेदारांच्या खात्यावरून ७१५०० रुपयांची रक्कम अपहार केल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आल्यावर आरोपी विजय भोवड यांनी सदर ७१५०० रुपये किरकोळ सदरी जमा केले परंतु सदर ७१५०० पैकी वरील एकूण ३६ खातेदारांच्या खात्यात ५४५०० रुपये रक्कमेचा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने भारतीय डाकविभागाच्या नियमानुसार अपहाराची रक्कम ५० हजार रुपयेपेक्षा जास्त झाली असल्याने याबाबत उपविभाग राजापूरचे डाकघर यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून विजय भोवड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com