त्यांना विनायक राऊत यांचा पराभव बघण्यासाठी १० वर्ष वाढवावी लागली दाढी,अनोख्याा संकल्पाची राजापुरात चर्चा
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे यापूर्वीचे खासदार विनायक राऊत यांचा पराभव व्हावा यासाठी राजापूर तालुक्यातील सागवे येथील संदेश कुलकर्णी यांनी आपली दाढी वाढवून प्रतिज्ञा केली होती. जो पर्यंत राऊत यांचा पराभव होणार नाही तोपर्यंत आपण दाढी कापणार नाही असा निर्धार त्यानी केला होता एखाद्या व्यक्तीला मतदार संघाने तब्बल दहा वर्षे खासदारकी बहाल केलेली असताना त्याची खासदारकी व निष्क्रीयताच जर जनतेच्या मुळावर उठत असेल तर जोपर्यंत राऊत यांचा पराभव होत नाही तोपर्यंत दाढी करणार नाही, असा चंगच कुलकर्णी यांनी बांधला होता. त्याप्रमाणे चार जून रोजी राऊत यांचा पराभव झाल्याची खात्री होताच कुलकर्णी यांनी कात्रादेवी येथे आपली दाढी काढली व आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. या अनोख्याा संकल्पाची एकच चर्चा राजापूर तालुक्यात होत आहे. www.konkantoday.com