राजापूर, लांजा-साखरपा व चिपळूण-संगमेश्वर हे दोन मतदार संघ काँग्रेसला सोडावेत
आगामी विधानसभा निवडणूकीत राजापूर, लांजा-साखरपा व चिपळूण-संगमेश्वर हे दोन मतदार संघ काँग्रेसला सोडावेत असा काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे तसा प्रस्ताव पक्षाच्या वतीने प्रदेश काँग्रेस व राष्ट्रीय कार्यकारणीकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती काँग्रेसच्या माजी आमदार अॅड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी केली आहे. राजापूर, लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघातुन यावेळी स्थानिकच उमेदवार हवा अशी सगळयांची मागणी असून पक्षाने संधी दिली तर आपण विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचेही अॅड. सौ. खलिफे यांनी सांगितले.
www.konkantoday.com