एस टी महामंडळाचा भोंगळ कारभार,रत्नागिरी – मुंबई ही बस ड्रायव्हर नसल्यानेतब्बल दीड तास सुटली नाही
रत्नागिरी रहाटागर बसस्थानकावरून काल रात्री 9 वाजता सुटणारी रत्नागिरी - मुंबई ही बस ड्रायव्हर नसल्याने 10.30 वाजले तरी सुटली नाही.
हा प्रवास करण्यासाठी खेड्यातील अनेक प्रवासी 8 वाजल्यापासून रहाटघर बसस्थानक, रत्नागिरी येथे सामानसुमान व लहान मुले, महिला यांना घेऊन आले होते,याबाबतीत रत्नागिरी डेपो मॅनेजर यांचेशी बोलणे केले असता,त्यांनी सॉरी म्हणून वेळ निभावून नेली, तब्बल दीड तास एस टी महामंडळाला पर्यायी ड्रायव्हर मिळत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त करीत महामंडळाच्या अशा भोंगळ कारभाराचे अक्षरशः धिंडोडे काढले आहेत, बहुजन हिताय बहुजन सुखात या ब्रीद वाक्याची अशा भोंगळ कारभारामुळे प्रवाशांनी निषेध केला असून अशा मुळेच प्रवासी खाजगी बस मधून जाणे पसंत करतात असे बोलत आहेत.
www.konkanyoday