
भात पिकाच्या नुकसानीच्या पाहणीसाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज जिल्हा दौर्यावर
परतीच्या पावसामुळे झालेल्या भातपिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यााठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे आज २३ ऑक्टोबरला खेड, रत्नागिरी तालुका दौर्यावर येत आहेत.
आज सायंकाळी ५ वा. ना. दरेकर यांचे खेड शहरात आगमन होईल. अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या खेड तालुक्यातील भातपिकांच्या नुकसानीची पाहणी आज ना. दरेकर हे करणार आहेत. रात्रौ ८.३० वा. ना. दरेकर यांचे रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात आगमग होईल. आज रात्री ना. दरेकर यांचा विश्रामगृहात मुक्काम असून शनिवारी ते रत्नागिरी तालुक्याच्या विविध गावांमधील भातपिकाच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.
परतीच्या पावसामुळे जिल्ह्याच्या बहुतांशी भागातील कापणीयोग्य झालेल्या भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने फक्त पंचनाम्याचे आदेश दिले असून शेतकर्यांना द्यावयाच्या नुकसान भरपाईबाबतचा अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही.
www.konkantoday.com