एसटी बस व सिमेंट मिक्सरच्या मध्ये अडकली दुचाकी, दुचाकी वरील दोन मुली सुदैवाने बचावल्या रत्नागिरी शहरातील घटना
रत्नागिरी शहरातील अभुदय नगर येथील रस्त्यावर आज संध्याकाळी मिक्सर आणि बसच्या मध्ये टू व्हीलर अडकल्याने मोठा अपघात झाला दुचाकी वरील दोन्ही मुली सुदैवाने वाचल्या मात्र दुचाकीची पुरा चक्काचूर झाला बसच्या बाजूने सदरच्या मुली दुचाकी वरून जात असता बाजूला आलेल्या मिक्सरने यादुचाकीला घासून नेले त्यामुळे दोन मोठ्या गाड्यांच्या मध्ये ही दुचाकी अडकली सुदैवाने वेळीच प्रकार लक्षात आल्यावर वाहने थांबवण्यात आली त्यामुळे दुचाकी वरील मुलींचा जीव वाचला मात्र या अपघातात दुचाकीचे पूर्ण नुकसान झाले आहे
www.konkantoday.com