
लोकशाहीमध्ये कोणालाही कुठलाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार, पक्षाला जागा वाटप हे निर्णय नेतेमंडळी घेतात -पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निकालानंतर खासदार निलेश राणे यांनी केलेल्या ट्वीटनंतर रत्नागिरी विधानसभेच्या दाव्यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलेय की मला जे राजकीय ज्ञान आहे, त्यामध्ये मतदारसंघ कुणाला सोडायचा, कोण उमेदवार असेल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, भाजपमधून देवेंद्रजी, राष्ट्रवादीकडून अजितदादा पवार ठरवतात. लोकशाहीमध्ये कोणालाही कुठलाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे, पक्षाला जागा वाटप हे निर्णय नेतेमंडळी घेत असतात.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत गुरूवारी रत्नागिरीत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर बोलत होते. मी महायुतीतला एक जबाबदार मंत्री आहे. त्यामुळे निलेश राणे यांनी जे ट्विट केले आहे, ती त्यांची भावना असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. अशी भावना लोकशाहीमध्ये कोणीही व्यक्त करू शकतो, असेही त्यांनी बोलताना म्हटले आहे. www.konkantoday.com