
राजापूर तालुक्यातील केळवली निखरे येथे शिमगोत्सवानिमित्त फटाके लावण्यावरून दोन कुटुंबात हाणामारी
_राजापूर तालुक्यातील केळवली निखरे येथे शिमगोत्सवानिमित्त पालखी घरात आल्यानंतर फटाके लावण्यावरून झालेल्या वादातून दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबामध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली. सोमवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी दोन्ही गटातील ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विलास खाड्ये, विकास खाड्ये व रघुनाथ खाड्ये हे सख्खे भाऊ असून एकमेकांशेजारी राहतात. मात्र त्यांच्यामध्ये मागील ५ वर्षापासून वाद आहेत. अशातच सोमवार १ एप्रिल रोजी ७ च्या सुमारास विकास यांच्या घरी पालखी आल्याने त्यांनी घराच्या पुढील भागात फटाके वाजवले. या फटाक्यांचा कचरा विलास यांच्या अंगणात आला. दरम्यान शेजारी राहणारा भावेश खाड्ये हा विकास यांच्या अंगणातील फटाक्यांच्या कागदाचे तुकडे झाडत होता. त्यावेळी विलास यांना आमच्या अंगणातील कागदाचे तुकडेही झाड, असे सांगितले. याचा राग आल्याने विकासने लाकडी काठीने मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यापाठोपाठ विकास याची पत्नी उदया यांच्यासह रघुनाथ खाड्ये, विक्रांत विकास खाड्ये व उज्ज्वल खाड्ये यांनीही शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मला सोडविण्यासाठी आलेला माझा मुलगा व सून यांनाही मारणा केलल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार पोलिसांनी विकास खाड्ये, उदया खाड्ये, रघुनाथ खाड्ये, विक्रांत खाड्ये व उज्ज्वल खाड्ये (रा. केळवली निखरेवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. www.konkantoday.com