चिपळुणात अतिक्रमण हटवताना व्यापारी व नगरपरिषद कर्मचार्यांत झटापट
चिपळूण बाजारपेठेतील गटारे व गटारांबाहेर माल, साहित्य लावणार्या व्यापार्यांवर गुरूवारपासून कारवाई करण्यास नगर परिषदेने सुरूवात केली आहे. मात्र पहिल्याच दिवशी व्यापारी, त्याचा कामगार व कर्मचार्यांमध्ये बाचाबाची होवून व्यापार्यांने शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अतिक्रमण हटवल्याने गटारे व बाजारपेठ मोकळी झाली असून ही कारवाई सुरूच राहणार आहे.
गेल्या काही वर्षापासून बाजारपेठ अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता बाजारपेठेतून चालणेही कठीण बनले आहे. तर बाजारपेठेतील गटारे अनेक वर्षे अतिक्रमणामुळे बंदच होती. त्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावरच येत होते. हा प्रकार टाळण्यासाठी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी काही दिवसांपूर्वी गटारे मोकळी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
www.konkantoday.com