खेड शहराजवळील जगबुडी नदीपात्रातून दिवसाला २०० ब्रास गाळ उपसा
खेड शहरातील जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्यासह बेटे काढण्यासाठी आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्याने २ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर होताच प्रत्यक्षात गाळ उपसण्याचे कामही हाती घेण्यात आले. अलोरे जलसंपदाच्या यांत्रिकी विभागामार्फत युद्धपातळीवर गाळ उपसण्याचे काम सुरू असून दिवसाला २०० ब्रास नदीपात्रातून गाळ उपसा केला जात आहे. यासाठी २ पोकलॅनसह ६ डंपर आदी यंत्रसामुग्री तैनात करण्यात आली आहे. पाऊस पडेपर्यंत गाळ उपसण्यासह बेट काढण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले. www.konkantoday.com