
दापोली तालुक्यातून यावर्षीच्या हंगामात दापोलीतून ५०० टन काजू बिया कारखान्यात
दापोली तालुक्यातून यावर्षीच्या हंगामात सुमारे ५०० टन सुक्या काजूच्या बिया कारखान्यांमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती बागायतदारांकडून देण्यात आली.
यावर्षी ओला काजू ८०० रुपये किलोने विकला गेला तर सुक्या काजूबीचा दर १०० रुपयांपासून सुरू होवून ११२ ते ११५ रुपयांवर येवून थांबला. यावर्षी दापोलीतून ४०० ते ५०० टन काजूबिया मोठमोठ्या कारखान्यांमध्ये गेल्याचे दापोलीतील व्यावसायिकांमधून सांगण्यात आले.